Posts

Showing posts from September, 2025

आभिप्राय

Image
                              श्रावणमासी हर्षमाणसी.       "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे"  संस्कृतीत श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्वाचा मानला जातो. निसर्गसौंदर्य, धार्मिक उत्सव, सण-समारंभ यांचा संगम म्हणजे श्रावण. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्यात निसर्गाचे रूपच पालटते. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते, झाडांना नवी पालवी फुटते, डोंगर, टेकड्या हिरवाईने नटतात.व सर्व हिरवे गार व सुंदर दिसते पावसाच्या सरी धरतीवर बरसतात आणि वातावरण आल्हाददायक होते. शेतकरी शेतात राबत असतो. त्याचे पिक भरुन आले असलेले पाहुन मन आनंदी होते.सकाळ सकाळी  पक्षाचा मधुर आवाज मनाला आनंदीमय करते.  महिनाभर भक्तजन उपवासरुद्राभिषेक, आणि शिवपूजा करतात. सोमवारी ‘श्रावण सोमवार’चे व्रत केले जाते.  श्रावण महिन्यात अनेक सण येतात नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, मंगळागौर, नारळी पौर्णिमा हे काही प्रमुख सण. रक्षाबंधन हा भाऊ-बहीण प्रेमाचा सण असतो. गोपाळकाला साज...